Aajcha Hawaman Andaj Live :- नमस्कार सर्वांना. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा अपडेट आहे. या दिवशी महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना कोसळणारा अवकाळी पाऊस हवामान विभागाचा या भागांना इशारा
काय आहे हवामान विभागाचा अंदाज कोणत्या जिल्ह्यात कसा हा पाऊस आहे. संपूर्ण माहिती जाणून घेऊया. महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना पाऊस पाठलाग सोडायला तयारच नाही. खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे आणि परतीच्या पावसामुळे शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले.
गेल्या तीन-चार दिवसापासून राज्यात बहुतांशी जिल्ह्यात ढगाळ हवामान कायम आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये कसा पाऊस असेल येत देखील महत्त्वाचा आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये काल सायंकाळी तुरळ ठिकाणी पावसाची नोंद करण्यात आलेली आहे.
याशिवाय भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवस पावसाची शक्यता असल्याचा अंदाज देखील दिला आहे. पुन्हा एकदा रब्बी हंगामात अवकाळी पाऊस कोसळणार असल्याची शक्यता आहे.हवामान अंदाज आजचा
राज्यातील काही भागात खरीप हंगामातील कापूस पिक वावरातच उभे असून कापसाच्या वेचण्या अजून सध्या बाकी आहे. आणि या सर्वांचा विचार करता, राज्यात पावसाची शक्यता आहे.
आता हे हवामान शेतकऱ्यांचे डोके दुखणे झाली आहे. अशातच भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या नवीन सुधारित हवामान अंदाजानुसार 25 ते 27 डिसेंबर रोजी राज्यात पावसाची शक्यता आहे.
या कालावधीत मध्य महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, कोकणात पावसाची शक्यता असल्याचा हवामान विभागाने नमूद केलेले आहे. शेतकऱ्यांनी सावध राहण्याचे आव्हान केले जात आहे. अशा प्रकारचे हे हवामान विभागाचं राज्यातील पावसा संदर्भात अपडेट आहे.