Dadasaheb Gaikwad Swabhiman Yojana : नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या राज्य सरकार तसेच केंद्र सरकार ही शेतकऱ्यांसाठी व इतर नागरिकांसाठी नवनवीन योजना या अमलात आणत असते.
तसेच काही घटकांसाठी राज्य सरकारने दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमानी योजना ही सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दोन एकर बागायती किंवा चार एकर जिरायती जमीन साठी शंभर टक्के अनुदान दिले जाते.
तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता अटी अर्ज कसा करायचा आहे. याविषयी आपण या लेखांमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत त्यासाठी हा लेख पूर्ण वाचा.
अर्जदार अनुसूचित जाती किंवा नवबुद्ध घटकातील प्रसिद्ध दारिद्र रेषेखालील असावा तो भूमिहीन असावा. तसेच भूमिहीन असल्याचा सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
या योजनेमध्ये संबंधित लाभार्थ्यांनी त्यांच्या गावात जमीन देण्यास प्राधान्य दिले जाते. परंतु यासाठी समाज कल्याण विभागाला प्राप्त होणारा निधी हा अपूर्ण आहे. तसेच शेतजमीन सुद्धा कमी दरात मिळत नसलेली सध्या चित्र आहे.
आतापर्यंत 320 भूमिही नागरिकांना शेतजमीन मिळाली आहे शेत जमिनीतून ते उत्पन्न मिळवत आहेत. या भूमिहीनांना 100 एकर (Dadasaheb Gaikwad Swabhiman Yojana) जमीन वाटप केली. ही योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी समाज कल्याण विभाग कार्य करत आहे.
जिल्हा दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमानी योजना सुरू झाल्यापासून तर सन 2020 पर्यंत 320 भूमीहिनाना. शेतजमीन मिळाली आहे. त्यामुळे शेतकरी 116 एकरचे मालक झाले आहेत.