E-Prime Mover Machine prise: नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आजच्या या लेखांमध्ये आपण अशा एका यंत्राविषयी जाणून घेणार आहोत. ज्यामुळे आपल्याला शेतीमध्ये लागणाऱ्या मजुरांची ही जास्त प्रमाणामध्ये गरज भासणार नाही आहे.
हे यंत्र पेरणी पासून फवारणी पर्यंत सर्वच कामे करून घेते. तर ही मशीन कोणते आहे या मशीनची किंमत काय आहे. व ही मशीन कसे काम करते याविषयी सविस्तर माहिती पाहण्यासाठी हा लेख वाचा.
E-Prime Mover Machine prise
शेतकरी मित्रांनो आता शेती करायचं म्हटलं तर शेतीसाठी मजूर मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना बऱ्याच अडचणींना समोर जावे लागते याचाच विचार करता आता हे नवीन असं यंत्र हे निर्माण केले गेलेले आहे. ज्यामध्ये शेतकरी पेरणी पासून ते फवारणी पर्यंत प्रत्येक काम करू शकतो.या मशीन साठी आपल्याला पेट्रोल किंवा डिझेल ची गरजही नाही हे मशीन सोलार सिस्टम वर चालते. तर या मशीनची खासियत काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत.
ई प्राइम मूव्हर मशीन
शेतकरी मित्रांनो या यंत्राचे नाव आहे ई प्राइम मूव्हर मशीन शेतकरी मित्रांनो ही मशीन आपल्याला सर्वच कामांमध्ये मदत करते. या मशीनच्या सहाय्याने पेरणी आपल्या शेतातील तण काढणे की कीड रोग नियंत्रण फवारणी व आणखी काही गोष्टींसाठी या यंत्राचा आपल्याला फायदा होतो.हे यंत्र आल्याने शेतात तर काढणीपासून ते कीटकनाशक शिंपडण्यापर्यंत सर्वच कामे अगदी सहजगतीने होतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मजुराचा खर्चही वागतो शेतकरी या मशीनच्या साह्याने पैसेही कमवू शकतात. आणि या मशीन साठी (E-Prime Mover Machine prise) आपल्याला कोणताही डिझेल व पेट्रोलचा इतर खर्च नाही आहे.
हे मशीन सोलर सिस्टम वर चालते मशीन ऑन बोर्ड बॅटरी मॉनिटरिंग सिस्टम आपत्कालीन स्टॉप स्विच डिजिटल स्पीड डिटेक्टर लोड. करंटेज मॉनिटरिंग सिस्टम पीक संरक्षणासाठी सेफ्टी स्विच यासारख्या आणि उपकरणांनी सुसज्ज आहे.