सांगली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना आठवड्यातील तीन दिवस. दिवसा आठ तास रडत रडत खडक वीज देणाऱ्या महावितरण कंपनीने त्यात आणखी चार तासाची कपात करून जोरदार झटका दिला आहे. दिवसा मिळणाऱ्या वीज कपात केल्यामुळे शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
या जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात रब्बी हंगामामध्ये प्रामुख्याने ज्वारी गहू हरभरा आणि मका ही पिके शेतकरी मोठ्या प्रमाणात घेत असतात. आणि त्यांना या हंगामामध्ये पुरेशा प्रमाणामध्ये पाणी देण्याची गरज असते. त्यामुळे शेतकऱ्यांची या पिकांना पाणी देण्यासाठी सर्वत्र लगबग चालले आहे.
महावितरण कंपनी.
महावितरण कंपनीच्या रकडीत वीजपुरवठ्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या होत्या त्यामध्ये आता कंपनी दिवसा 20 देत आहे. परंतु त्यामध्येही चार तास विजेची कपात केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आणखी मोठा झटका दिला आहे.
सर्पदंशाचे प्रमाण वाढत आहे.
रात्री पाणी देण्याच्या प्रक्रियेमुळे बऱ्याच शेतकऱ्यांना विविध संकटांना सामोरे जावे लागत आहे. जसे की रात्री सर्प विंचू किंवा इतर आणखी जंगली प्राणी हे रात्रीच्या वेळेस शिकारीसाठी बाहेर निघत असतात. यामध्ये आता सर्पदंशाचे प्रमाण वाढत आहे. रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांना पुरेसा उजाड नसल्यामुळे या सर्व घटना सामोर येत आहेत.