सिन्नर । Sinnar
तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींचे निकाल (Gram Panchayat Results) जाहीर झाले असून सर्वच ग्रामपंचायतींवर अटीतटीचे सामने रंगल्याचे पाहायला मिळाले.
यात नांदूर शिंगोटे ग्रामपंचायतच्या सरपंचपदी शोभा बरके, शहाच्या सरपंचपदी संभाजी जाधव, सायाळेच्या सरपंचपदी विकास शेंडगे, पाटपिंपरीच्या सरपंचपदी नंदा रमेश गायकवाड यांची निवड झाली आहे.
तसेच किरतांगळीच्या सरपंचपदी कुसुम शांताराम चव्हाणके, डुबेरेवाडीच्या सरपंचपदी दत्तू गोफणे, कारवाडीच्या सरपंचपदी रूपाली निलेश जाधव, वडगाव पिंगळाच्या सरपंचपदी शेवंताबाई गेनू मुठाळ, लोणारवाडीच्या सरपंचपदी जयश्री सदाशिव लोणारे, आशापुरच्या सरपंचपदी सुलोचना सिताराम पाटोळे, ठाणगावच्या सरपंचपदी नामदेव शिंदे, तर उजनीच्या सरपंचपदी निवृत्ती लहानू सापनर यांची यांची वर्णी लागली.
दरम्यान, अटीतटीच्या सामन्यांत १२ ग्रामपंचायतींपैकी ठाणगाव, डूबेरेवाडी, वडगाव पिंगळा, सायाळे, लोणारवाडी व कारवाडी ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे माजी आमदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) गटाचे तर शहा, पाटपिंप्री, उजनी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे (MLA Manikrao Kokate) यांच्या गटाचे सरपंच निवडून आले आहेत.