आपला बळीराजा 🐄🌾

संपादक - Shelke. G. A

नवीन बातम्या

Khara 7/12 Utara kasa olkhaycha Marathi | खरा सातबारा कसा ओळखायचा

Khara 7/12 Utara kasa olkhaycha Marathi | खरा सातबारा कसा ओळखायचा



तलाठ्याची सही

सातबारा उताऱ्यावर तलाठी ची सही असते. जर तुम्ही करत असलेल्या व्यवहारात जो सातबारा उतारा तुमच्याकडे सादर केला जातो. त्यावर तलाठ्याची सही नसेल तर तो सातबारा बोगस असतो. सरकारने गेल्या काही वर्षापासून डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे.


या सातबारा उताऱ्यावर खालचा भागात स्पष्टपणे सूचना दिलेली असते. की या सातबारा उताऱ्यावरील गाव नमुना सात आणि गाव नमुना 12 डिजिटल स्वाक्षरीत तयार केला. असल्यामुळे त्यावर कोणत्याही सही शिक्के ची गरज नाही तुमच्यासमोर सादर केलेल्या डिजिटल सातबाराच्या प्रिंट आउट वर अशी सूचना नसेल तर तो बोगस सातबारा असतो.


क्यू आर कोड


क्यू आर कोड सातबारा उताऱ्यातील नवीन बदलानुसार सातबारा उताऱ्यावर किंवा कोड दिलेला असतो. तुमच्याकडे आलेल्या सातबारा उताऱ्यावर तो नसेल तर तो सातबारा बोगस असतो. जमिनीच्या व्यवहार दरम्यान किंवा शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी एखादी व्यक्ती सातबारा. उताऱ्याची प्रिंट आऊट घेऊन आल्यास त्यावरील क्यूआर कोड स्कॅन करता येतो.


तो स्कॅन केला की ओरिजनल सातबारा उतारा दिसतो. यावरून संबंधित व्यक्ती घेऊन आलेला सातबारा उतारा खरा आहे की खोटा हे पडताळून पाहता येतो.


एल जी डी कोड


एल जी डी कोड आणि महाभुमी प्रकल्पाचा लोगो सातबारा उताऱ्यावरील नवीन बदलानुसार सातबारा उताऱ्यावर. आता शेतजमिनीच्या माहिती सोबतच गावाचा युनिक कोड क्रमांक नमूद केलेला असतो. सातबारा उताऱ्यावर गावाच्या नावासमोर हा कोड कंसात नमूद केलेला असतो.


याला सरकारी भाषेत लोकल गव्हर्मेंट डायरेक्टरी असं म्हणतात तुमच्याकडे आलेल्या. सातबारा उताऱ्यावर हा कोड नमूद केलेला नसेल तर तो सातबारा उतारा बोगस असतो.