आपला बळीराजा 🐄🌾

संपादक - Shelke. G. A

नवीन बातम्या

Nuksan Bharpai List | या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम नुकसान भरपाई जाहीर | पंतप्रधान पिक विमा योजना हंगाम 2022

या जिल्ह्याला 101 कोटी मंजूर.

नांदेड जिल्ह्यात प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2022 मध्ये युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनीकडे 10 लाख 57 हजार 508 अर्जदार शेतकऱ्यांनी सहा लाख 51 हजार 422 हेक्टर क्षेत्र विमारक्षित केले होते.


 हे आज सोयाबीन कपाशी तूर ज्वारी एवढी व मूग या पिकांसाठी विमा काढण्यात आला होता. दरम्यान यंदा पावसाळ्यात अनेक वेळा अतिवृष्टीची नोंद झाल्यामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.

घटकांतर्गत 467.75 कोटीचा परतावा जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण अधिक असल्याने खरिपातील सव्वा पाच लाख हेक्टर वरील पिकाची नुकसान झाले होते. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी हंगामातील प्रतिकूल परिस्थिती घटकांतर्गत शेतकऱ्यांना नुकसानीच्या 25% भरपाई मिळावी. यासाठी यादी सूचना जाहीर केली होती.

ही अधिसूचना जाहीर केली होती यादी सूचना विमा कंपनीने मंजूर करून सोयाबीन, कपाशी, तूर,ज्वारी या पिका साठी विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांना 367 कोटी रक्कम मंजूर केली आहे.

यातील 85% नुसार ३१० कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत तर शिल्लक 15 टक्क्यानुसार 57 कोटी व दावा दाखल केल्याचे 101 कोटी असे 158 कोटी जमा करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे